कोल्हापुरातील कागल विधानसभेतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी आपली खंत बोलून दाखवली. विरोधकांनी मला भिकारी, हरामखोर, उंदीर म्हणून हिणवले. परंतु, आता जनता ही माझ्या बाजूने उभी आहे, त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी थेट लढत होणार आहे. समरजित घाटगे यांनी शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेत आपल्यावर लक्ष असू द्या अशी विनंती केली. गेल्या पाच वर्षात मला भिकारी, हरामखोर व उंदीर म्हणून हिणवण्यात आले. पण या गोष्टी आम्ही वैयक्तिक घेतल्या नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या विचारांनुसार बोलतो. मी आजही त्यांना आदराने हसन मुश्रीफ साहेब असे बोलतो. परंतु, एखादा व्यक्ती जेव्हा आपली निष्ठा विकतो. तेव्हाच तो अशी चुकीची विधाने करतो, असे घाटगे म्हणाले.