भाजपशासित हरयाणात महाराष्ट्रकन्येचा छळ! डॉ. समिना दलवाईंच्या समर्थनार्थ 400 हून अधिक विचारवंत एकवटले

भाजपशासित हरयाणात महाराष्ट्रकन्या लेखिका डॉ. समिना दलवाई यांचा मुस्लिम धर्मीय असल्यामुळे भयंकर छळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. समिना सोनिपत येथील ओ. पी. जिंदाल विश्व विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. विद्यार्थ्यांना लैंगिक विषयावर लेक्चर देताना डेटिंग प्रोफाईल दाखवले म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा गलिच्छ विचारसरणीने शैक्षणिक स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे, असा निषेध नोंदवत सजग नागरिकांसह 400 हून अधिक विचारवंत डॉ. समिना यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

डॉ. समिना यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून मोठय़ा प्रमाणावर बौद्धिक लिखाण केले असून सातत्याने कष्टकरी, दलित व अल्पसंख्याकांवरील भेदभावावर प्रकाश टाकला आहे. मुस्लिम धर्मीय असलेल्या डॉ. समिना यांना भाजपशासित हरयाणातील धर्मांधतेचा कटू अनुभव घ्यावा लागला आहे. लैंगिक विषयावर लेक्चर देताना विद्यार्थ्यांना काही डेटिंग प्रोफाईल दाखवल्याचा आरोप करीत हरयाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी डॉ. समिना यांच्याविरुद्ध सोनिपत पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. विशेष म्हणजे एकाही विद्यार्थ्याने तक्रार केली नसताना महिला आयोगाने हे पाऊल उचलले. लेक्चरचा व्हिडीओ भाजपने ट्विट केला होता. त्यामुळे आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डॉ. समिना या मुस्लिम धर्मीय असल्याने त्यांना टार्गेट केले आहे. हा गलिच्छ विचारसरणीने शैक्षणिक स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे, असे परखड मत व्यक्त करीत 400 हून अधिक विचारवंत आणि नागरिकांनी डॉ. समिना यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाकडे दुर्लक्ष का?
विद्यार्थ्यांना जगातील कटू सत्यांची ओळख करून देणे, त्यांना सभोवतालच्या सामाजिक-राजकीय समस्यांचा सामना करण्यासाठी सक्षम करणे आहे हे शिक्षकांचे कार्य असते. तेच डॉ. समिना दलवाई यांनी लैंगिक विषयावर लेक्चर देताना केले. त्यांच्याविरुद्ध एकाही विद्यार्थ्याची तक्रार नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आणि महिलांच्या प्रतिष्ठsला धक्का लावल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप करणाऱया हरयाणा महिला आयोगाचे महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरोधातील लढय़ाकडे दुर्लक्ष का, असा सवाल विचारवंतांनी उपस्थित केला आहे.

राजकीय दबावातून कारवाई
ओ. पी. जिंदाल विश्व विद्यापीठ प्रतिष्ठत खासगी विद्यापीठांपैकी एक आहे. कथित आरोपामागील सत्य शोधण्यासाठी विद्यापीठाने कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन केलेले नाही. राजकीय दबावाला बळी पडून शैक्षणिक स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे हे अत्यंत घातक उदाहरण आहे. कोणत्याही चौकशीविना तसेच म्हणणे मांडण्याची संधी न देता डॉ. समिना दलवाई यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नंतर महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा तसेच धार्मिक व वैचारिक आधारावर विद्यार्थ्यांशी भेदभाव केल्याचा आरोप केला. महिला आयोगाने केलेली ही कारवाई पूर्णपणे चुकीची असून हे वेळीच थांबले पाहिजे, असे हिंदुस्थानातील विविध विद्यापीठे तसेच मॅकगिल युनिव्हर्सिटी, केंट युनिव्हर्सिटी, केंब्रिज व कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील प्राध्यापकांनी जाहीर निवेदनात म्हटले आहे.