हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद

 

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. नेरूळ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा बंद आहे. पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून कार्यालयात लेटमार्क लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान गेल्या एक तासापासून एकही लोकल धावलेली नाही. रेल्वे स्थानकांवर नेरूळ येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल अनिश्चित काळासाठी ठप्प असल्याची उद्घोषणा सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा तांत्रिक बिघाड दूर करण्यास अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

सकाळच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे कामावर निघालेल्या लोकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. अनेक जणांनी पर्यायी मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे सदर मार्गावरून धावणाऱ्या बेस्ट बस खचाखच भरल्या आहेत. तर काहींनी दांडी मारली असून काहींनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

https://youtube.com/shorts/U_S44jjknfA?si=h4mnMSAWbCaZAJSR