इस्त्रायलच्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या कुख्यात आणि क्रूरकर्मा याह्या इब्राहिम हसन सिनवार याचा खात्मा करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पॅलेस्टिनींचा लादेन म्हणून याह्या इब्राहिम हसन सिनवार हा ओळखला जायचा.
इस्त्रायल सैन्याकडून गाझामध्ये हमासच्या विरोधात वर्षभरापासून कारवाई सुरू आहे. या आठवड्यात इस्त्राईलने केलेल्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा झाल्याचे समोर आले होते. मात्र सिनवार याच्या मृतदेहाच्या डिएनए चाचणीचे रिपोर्ट्स आल्यानंतर इस्त्राईलच्या संरक्षण मंत्र्यांनी त्याबाबत अमेरिकेला माहिती दिली आहे.
हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या झाली आणि त्यानंतर याह्या इब्राहिम हसन सिनवारवर याच्याकडे हमासच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली होती. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड म्हणून सिनवारला ओळखले जाते. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला अणि सुमारे 250 जण ओलीस ठेवले. याह्या सिनवारने या हत्याकांडाचे कारस्थान आखल्याचे इस्रायलचे अधिकारी सांगतात