मिठीमधील गाळ काढण्याचे निम्मे काम पूर्ण, 1 लाख 17 हजार 970 मेट्रिक टन गाळ काढला

मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले असून जानेवारीपासून झालेल्या कामात 1 लाख 17 हजार 970 मेट्रिक टन (54.57 टक्के) गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिल्लक गाळ काढण्याचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असल्यामुळे पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या दिवशीदेखील मुंबईभरात विविध ठिकाणी भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. मिठी नदीतील गाळ उपसण्याचे काम द्विकार्षिक कंत्राटाद्वारे करण्यात येते. प्रतिकर्षी महानगरपालिकेकडून मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येते. यामध्ये पावसाळय़ापूर्वी 80 टक्के व पावसाळय़ात आणि पावसाळय़ानंतर प्रत्येकी 10 टक्के गाळ काढण्याचे काम केले जाते. यानुसार 2024 या कर्षाकरिता सुमारे 2 लाख 70 हजार मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील टप्पा-1 (पावसाळय़ापूर्की) मधील कामे प्रगतिपथाकर आहेत. नदीची टप्पा-1 मधील गाळ काढण्याची कामे जानेकारीपासून सुरू करण्यात आली. एकूण 2 लाख 16 हजार 174 मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यातील सद्यस्थितीत निम्म्याहून जास्त गाळ काढण्यात आला आहे.

पाडव्यादिवशी आयुक्त, अधिकारी ऑन फिल्ड

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या पाडव्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असताना पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अधिकाऱयांसोबत पावसाळापूर्व कामांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर, सहआयुक्त  चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त देकीदास क्षीरसागर, चक्रधर कांडलकर, रमाकांत बिरादार, उल्हास महाले, देकीदास क्षीरसागर, किश्वास मोटे, सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, गजानन बेल्लाळे, भास्कर कसगीकर, जल अभियंता पुरुषोत्तम माळकदे आदी अधिकारी उपस्थित होते.