आरोग्य विम्यात दिलासा नाहीच; जीएसटी लागणारच, कोटय़वधी विमाधारकांची केंद्राने केली निराशा

आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या हप्त्यांवरील जीएसटी कमी करण्याच्या मागणीला आज केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा विषय मंत्रिमंडळ गटाकडे सोपवून सरकारने कोटय़वधी विमाधारकांच्या तोंडाला पाने पुसली.

आता हा निर्णय मंत्रिमंडळ गटाच्या अहवालावर अवलंबून आहे. हा अहवाल ऑक्टोबरमध्ये आल्यास त्यावर नोव्हेंबरच्या जीएसटी बैठकीत चर्चा होऊ शकेल.

कर्करोगावरील औषधांवर आता 5 टक्के जीएसटी

कर्परोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय आज जीएसटी मंडळाने घेतला. यामुळे आता कर्करोगावरील औषधांवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल. नमकीनवरील जीएसटीही 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.