अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला महागायक

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा-आवाज तरुणाईचा’ या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला. या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. गोपाळ गावंडे याचा अतुलनीय आत्मविश्वास आणि संपूर्ण पर्वातील अपवादात्मक कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला.