दमलेल्या बाबांची कहाणी गाण ऐकल की डोळ्यात पाणी येत नाही असा विरळाच. वडिलांचे आपल्या आयुष्यात असलेल महत्व शब्दा पलीकडचे आहे. हल्ली जशी आई वडिलांच्या खांद्याला खांदा लावून घराची जबाबदारी उचलते तसे आता वडीलही मुलांच्या संगोपनात खूप हातभार लावत आहेत.
फादर्स डे अगदी जवळ आला असताना, वडिलांचा मुलांच्या संगोपनात किंवा कुटुंबासाठी योगदान देण्यात खूपच कमी हातभार असतो असा गैरसमज कायम आहे. तथापि, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) च्या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइट कडून करण्यात आलेल्या ‘वन मॉस्क्युटो, काउंटलेस थ्रेटस’ (एक डास, अपरिमित धोका) या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालाने ही गैरसमजूत दूर केली आहे. पारंपरिक स्त्री-पुरुष विषयक भूमिकांपासून फारकत घेत आणि आधुनिक कुटुंबांमध्ये विकसित होत असलेल्या बदलाला अधोरेखित करत पालकत्व निभावताना दोन्ही पालकांकडून समान प्रयत्न करण्याविषयी भारतातील ९५% वडील सहमत असल्याचा प्रगतीशील दृष्टीकोन या अहवालातून अधोरेखित करण्यात आला आहे. प्रदेशानुसार, या भावनेशी सर्वाधिक सहमती दक्षिण भारतातील वडिलांमध्ये ९७% इतकी दिसून आली. त्यानंतर उत्तर भारतात आणि पश्चिम भारतात ९५% तर पूर्व भारतात हे प्रमाण ९२% आढळले.
पारंपरिकपणे, मातांना मुलांची काळजी घेणारी प्रमुख व्यक्ती म्हणून पाहिले जाते. वडील बहुतांशवेळा त्यांच्या कामात व्यस्त असल्याचे मानले जाते. तथापि, सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतातील ९४% वडील घरातील कामांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यावर आणि त्यांच्या मुलांची काळजी घेण्यावर विश्वास ठेवतात. प्रादेशिक पातळीवर दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमधील ९६% वडील, उत्तरेकडील राज्यांमध्ये ९३% आणि पूर्वेकडील भागात ९१% वडिलांचा या भावनेवर विश्वास आहे असे दिसून आले आहे.
या सर्वेक्षणाविषयी बोलताना, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) च्या होम केअरचे AVP आणि श्रेणी प्रमुख शेखर सौरभ म्हणाले, “गुडनाइट हा देशभरातील सर्वात प्रिय आणि पसंतीच्या घरगुती वापराच्या गोष्टीच्या ब्रँडपैकी एक आहे. गुडनाइटच्या या सर्वेक्षणामुळे भारतातील पालकत्व विषयक गोष्टींमध्ये होत असलेल्या परिवर्तनावर प्रकाश पडला आहे. हा उपक्रम म्हणजे आमच्या चालू असलेल्या मोहिमेचा एक भाग असून तिथे आम्ही वडिलांची बांधिलकी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग ती आपल्या पाल्याची झोप असो वा एकूणच पालकांची कर्तव्ये असोत वडील आता समर्पित भावनेने आपल्या जोडीदाराला पालकत्वाच्या प्रवासात पाठबळ देत आहेत.”
सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की वडिलांची बाजू हळवी, हळुवार असते. मुलाखती घेतल्या गेलेल्या ५०० हून अधिक वडिलांपैकी, उल्लेखनीय आकडेवारी म्हणजे ८८% वडिलांनी त्यांची मुले शांतपणे आणि डासांच्या त्रासापासून मुक्त आहेत ना याची खात्री करण्यासाठी मध्यरात्री जाग येत असल्याची नोंद केली. देशभरात हा कल असाच दिसून आला आहे. पूर्वेकडील प्रदेशातील वडिलांचा यात सर्वाधिक ९२% सहभाग आणि त्याखालोखाल उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशात ८६% सहभाग आहे.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे शेखर सौरभ पुढे म्हणाले, “आपल्या मुलांना डासांपासून पूर्णपणे सुरक्षित आणि सर्वात प्रभावी संरक्षण देण्यासाठी गुडनाइट पालकांसोबत भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रत्येक मुलाला रात्रीची चांगली झोप मिळायला हवी आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी पालकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही येथे आहोत यावर आमचा विश्वास आहे.”
फादर्स डे साजरा केला जात असताना, आजवरच्या काळात पालकत्वात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आणि सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. भारतभरात अधिक मजबूत, संतुलित कुटुंब आणि समान पालकत्वाच्या भावनेला मूर्त रूप देत आधुनिक बाबा त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आणि ते आनंदी राहतील याची खात्री करण्यात खूप गुंतलेले आहेत.
कृपया तपशीलवार अहवालासाठी येथे लिंक पहा: Goodknight Report: One Mosquito, Countless Threat