महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने सोने तस्करी करणाऱ्या सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. डीआरआयने कारवाई करून बारमधील 23.32 किलो सोने, वितळलेल्या स्वरूपातील सोने, 37 किलो चांदी आणि 5 लाख 40 हजार रुपये जप्त केले.
मुंबईत तस्करी केलेले सोने वितळवून शुद्धीकरण करून त्याची विक्री होत असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआय मुंबई युनिटने एका ठिकाणी कारवाई केली. डीआरआयने तेथे काम करणाऱ्या कामगार आणि मदतनीस यांचे जबाब नोंदवले. जबाब नोंदवून हे सोने वितळवणाऱ्या सिंडिकेटच्या सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. जप्त केलेले सोने हे तस्करीचे असल्याचे समोर आले आहे.