सोने पहिल्यांदाच 74 हजारांवर! चांदीची चमकही 92 हजारांपार!!

सोन्याचांदीने पुन्हा भावाचा उच्चांक गाठला. तोळाभर सोन्याची किंमत 839 रुपयांनी महागली आणि सोने इतिहासात प्रथमच प्रतितोळा 74,222 रुपये झाले. चांदीही 6,071 रुपयांनी महागली असून किलोभर चांदीचा भाव 92,444 रुपये झाल्याची माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिली आहे.

सोन्याच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले आहेत. वर्षभरात सोन्याचा भाव तोळ्यामागे 10,870 रुपयांनी वाढला आहे. 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 63,352 रुपये एवढा होता. तो 21 मे रोजी 74,222 रुपये झाल्याची माहिती ‘आयबीजेए’ने आपल्या वेबसाईटवर दिली आहे. एक किलो चांदीचा भावही जानेवारीत 73,395 रुपये होता. तो आता 92,444 रुपयांवर पोहोचला. पुढील वर्षभरात सोन्याचा भाव 85 हजारांवर जाण्याची शक्यता आहे.