जिथून आलात तिथे परत जा…; न्यूझीलंडमध्ये भारतीयासोबत वर्णभेद

हिंदुस्थानातील अनेकजण चांगल्या नोकरीच्या, उच्च शिक्षणाच्या किंवा बेटर लाईफच्या आशेने परदेशात जातात. पण अनेक वेळा त्यांच्यासोबत अशा घटना घडतात, ज्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा आपल्या मायभूमीची आठवण येते. परदेशात आपल्यासोबत घडणाऱ्या अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान एका हिंदुस्थानी व्यक्तीची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परदेशात त्याला वर्णद्वेषाचा आलेला अनुभव शेअर केला आहे.

29 वर्षीय व्यक्तीने Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर न्यूझीलंडमधील आपले अनुभव शेअर केले आहेत. परदेशात राहून त्याला किती गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि यामुळे किती वेळा त्याला आपल्या देशाची आठवण आली हे त्यांनी सांगितले. कधी-कधी हा देश आपला नाही असे त्याला वाटायचे आणि आपल्याच देशाची उणीवही जाणवायची, असे त्तोयाने सांगितले.

‘मी एका आशेने न्यूझीलंडला आलो. न्यूझीलंड खूप सुंदर देश आहे आणि चांगल्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण इथे आल्यानंतर येथील परिस्थिती मला माझ्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसली. मी इथे अनेक स्वप्न घेऊन आलो होतो. मात्र ती स्वप्ने पूर्ण झाली नाही. मला न्यूझीलंडमध्ये वांशिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागला, यामुळे मला माझ्या देशाची , माझ्या मातृभूमीची खूप आठवण झाली. असे तो म्हणाला.

Unwelcome In New Zealand
byu/Lopsided_Tennis69 inindia

मला न्यूझीलंडमध्ये दररोज वर्णद्वेषाचा सामना करावा लागाचा. मी रस्तावरून जात असताना तेथील लोक माझ्यावर ओरडायचे. माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलायचे. त्यांनी अनेकदा मला टोमणे देखील मारलेत. मला माझ्या देशात परत जाण्यास सांगायचे. या परिस्थितीमुळे मला खूप एकटे वाटू लागले. तिथले लोक माझ्यापासून दूर राहिले आणि माझ्याशी बोलण्यातही संकोच करू लागले. हा अनुभव माझ्यासाठी खूप वाईट आणि निराशाजनक होता. मला नेहमी एकट असल्यासारख वाटायचं. असे तो म्हणाला.

वर्णद्वेषाच्या टोमण्यांचा सामना करत या हिंदुस्थानी तरुणाने न्यूझीलंडच्या संस्कृतीत आणि समाजात एकरूप होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने तेथील भाषा शिकण्याचाही प्रयत्न केला, जेणेकरून तो तेथील लोकांशी जुळवून घेऊ शकेल. मात्र या प्रयत्नात तो मानसिकरित्या पूर्णपणे खचून गेला होता. तेव्हा त्याला त्याच्या देशाची वेळोवेळी आठवण व्हायची.’मी माझ्या देशातल्या लोकांना कधीच परका माणूस वाटले नाही. हिंदुस्थानात अनेक भाषा आणि संस्कृतीची विविधता असूनही मला वेगळेपणाची जाणीव कधीच झाली नाही. पण न्यूझीलंडमध्ये घालवलेल्या दोन वर्षांच्या काळात मला प्रत्येक क्षणी बाहेरचा माणूस असल्याच्या वेदना सहन कराव्या लागल्या, हा अनुभव माझ्सासाठी खूप वेदनादायी ठरला. असा निराशाजनक अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला.