केसांना ‘स्टाइल’साठी करा तयार

केसांना स्टायलिंग करताना प्रथम केसांना त्यासाठी तयार करणे गरजेचे असते. प्रत्येकाच्या केसांचा पोत वेगवेगळा असतो. त्यानुसार वेगवेगळी उत्पादने वापरून त्यानंतर हेअरस्टाइल करणे अत्यंत आवश्यक असते.

काहींचे केस शुष्क (ड्राय) असतात. काहींचे फ्रीझी असतात किंवा काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे केस अगदी सरळ असतात. काहींचे केस फार सरळ नसले तरी फार सिल्की असतात. अशा वेळेस वेगवेगळय़ा केसांच्या ‘टेक्चर’प्रमाणे हेअरस्टाइलचे टिकणे त्यावर अवलंबून असते. मात्र जर आपण काही उत्पादने वापरली तर आपण केलेली हेअरस्टाइल जास्त काळ टिकवू शकतो. हेअरस्टाइल करताना जर अंबाडा, फ्रेंच रोल, मेसी बन घालायचे असतील तर तुम्ही कंडिशनर वापरून केस धुतले तरी चालू शकेल. मात्र जर तुम्हाला मोकळय़ा केसांची हेअरस्टाइल करायची असेल, तर मात्र कंडिशनरचा वापर न केलेलाच बरा. आपल्याला हवे असलेल्या हेअरस्टाइलसाठी आपल्याला सिरम, हीट प्रोटेक्टर, हेअर स्प्रे अशा काही गोष्टींचा वापर करण्याची आवश्यकता भासते.

हेअरस्टाइल करण्याच्या एक दिवस अगोदर जर तुम्ही केसांना तेल लावले असेल, तर तुम्हाला प्रथम केस शॅम्पूने नीट धुऊन काढावे लागतील. हेअरस्टाइल नीट बसतही नाही व चांगलीही दिसत नाही. तसेच केस धुतल्यानंतर त्यावर कंडिशनर लावू नये. त्यामुळे स्टाइल करताना ती नीट होत नाही. तसेच जर तुमच्या केसांवर काही केमिकल प्रक्रिया केल्या असतील आणि तुमचे केस डॅमेज झाले असतील, तर मात्र तुम्ही पंडिशनर लावणे योग्य ठरेल.

केसांना स्टायलिंग करताना प्रथम प्रीस्टायलिंग प्रोडक्ट लावून घेणे. प्रीस्टायलिंग प्रॉडक्ट लावून झाल्यानंतर प्रथम तुम्ही ब्लास्ट ड्राय करून घेणे व त्यानंतर ब्लो ड्राय करणे. ब्लो ड्राय केल्यामुळे केसांची स्टाइल नीट आणि क्लीन दिसेल. तसेच ब्लो ड्राय केल्यानंतर तुम्ही क्रीम्पिंग करून घेणे. क्रीम्पिंग केल्यामुळे तुमच्या केसांचा वॉल्यूम वाढण्यास मदत होईल व हेअरस्टाइल नीट बसण्यासही मदत होईल. तसेच क्रीम्पिंग केल्यामुळे तुम्हाला जर एखादे हेअर एक्सटेंशन लावायचे असेल तर ते तुम्हाला केसांमध्ये व्यवस्थित बसवता येते. केसांची स्टायलिंग करताना जर तुम्हाला स्ट्रेटनिंग करायचे असेल तर मात्र तुम्ही प्रथम ब्लो ड्राय करून घेणे व त्यानंतर स्ट्रेटनिंग करणे. असे केल्यामुळे तुम्हाला केसांमध्ये एक प्रकारचा व्हॉल्यूम मिळेल.

क्रीम्पिंग केल्यामुळे व्हॅल्यूम मिळेल व तुम्हाला हेअरस्टाइल करणे सोपे जाईल. यानंतर तुम्हाला पाहिजे तसा पफ काढायचा असल्यास तुम्ही हलकेसे बॅककोमिंग करू शकता. बॅककोमिंग म्हणजेच केसांना एक प्रकारे गुंतवण्याची प्रक्रिया असते. मात्र ही प्रक्रिया करताना केस जास्त प्रमाणात कसेही गुंतले गेले नाही पाहिजेत. त्याचीही एक योग्य पद्धत आहे. ती पद्धत जर तुम्ही योग्य प्रकारे केसांवर वापरली तर तुमचे केस वेडेवाकडे कसेही गुंतणार नाहीत.

बॅककोमिंग केल्यामुळे केसांना पाहिजे त्या ठिकाणी हाइट देऊ शकता. म्हणजेच केसांना पाहिजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम देऊन केसांची उंची वाढवू शकता. तसेच तुम्हाला एखादे एक्सटेंशन लावतानाही या बॅककोमिंगमुळे मदत होते. अशा प्रकारे जर तुम्ही हेअरस्टाइल करण्यापूर्वी योग्य प्रकारे आधी तयारी केली म्हणजेच तुमच्या केसांना तयार केले तर तुमची हेअरस्टाइल चांगलीच दिसेल.
शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
[email protected]