महिलांच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या टोळीला दोन गंठण व चार मोटारसायकलसह अटक

एक महिला राजीव गांधी चौक परिसरातून सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वराने त्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेहल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे येथे गुरनं 581/2023 कलम 392,34 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होते. पोलिसांनी तपासात दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून दोन गंठण, चार दुचाकी असा 5 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजीव गांधी चौक परिसरातून एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वराने त्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेहल्याची घटना घडली होती तपासा दरम्यान पोलीस पथक गुन्ह्याची पद्धत व इतर बाबींचा विश्लेषण केले . तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावरून संशयितांचा पुणे, हडपसर, टेंभुर्णी निलंगा व लातूर शहरातील विविध भागात शोध घेण्यात आला होता.

सुशील सुनील नाथभजन, वय 19 वर्ष, राहणार राजे शिवाजीनगर लातूर. आकाश उर्फ महेश रमेश टेळे, वय 25 वर्षे, राहणार राजे शिवाजीनगर लातूर. एक विधी संघर्ष बालक. यांना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरी केल्याचे कबूल केले तसेच पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतूनही एका महिन्याचे गंठण चोरल्याचे कबूल करून लातूर शहरातील विविध भागातून काही मोटारसायकली चोरल्याचेही कबूल केले आहे.

नमूद आरोपींनी चोरलेले दोन सोन्याचे गंठण व चार मोटारसायकली असा एकूण 5 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पोगुलवार व पोलीस अमलदार धैर्यशील मुळे करीत आहेत.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर,पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वातील टीम मधील सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र ढगे ,भीमराव बेल्हाळे , पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, महेश पारडे, गोविंद चामे, अभिमन्यू सोनटक्के, बालाजी कोतवाड, बळवंत भोसले ,प्रशांत ओगले, विनोद चालवाड, काकासाहेब बोचरे, अमित लहाने यांनी चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.