15 जुलैपासून देशभरात सेवा मोबाईलवर दिसणार कॉलरचे नाव; मुंबई, हरयाणात ट्रायल सुरू

तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आता स्पष्टपणे मोबाईलवर दिसणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने टेलिकॉम पंपन्यांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. टेलिकॉम पंपन्यांनी मुंबई आणि हरयाणा या ठिकाणी ट्रायल सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही चाचणी यशस्वी झाली आहे. आता येत्या 15 जुलैपासून संपूर्ण देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) नावाची ही सुविधा सुरू होईल. यामध्ये सिम कार्ड खरेदी करताना केवायसी फॉर्मवर भरलेल्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दिसणार आहे. स्पॅम, फ्रॉड कॉल आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही सेवा सुरू केल़ी.

स्पॅम कॉलला आळा
इनकमिंग कॉलवेळी नंबरसह कॉल करणाऱयाचे नावसुद्धा दिसणार आहे. सीएनपी सेवा पंपनीच्या सध्याच्या कॉलर आयडी ऑप्लिकेशनसारखीच आहे. देशात स्पॅम कॉल ही मोठी समस्या बनली आहे. एका सर्व्हेनुसार, 60 टक्के लोकांना दिवसभरात तीन तरी स्पॅम कॉल येतात.