वांद्रे-वरळी सी-लिंकवर भरधाव वेगात असलेली चार वाहने एकमेकांवर आदळली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी नाही. मात्र यात वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इनोव्हा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर शिरवडकर असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे.
अपघातानंतर सी-लिंकवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनेवेळी सी-लिंकवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून वांद्रे पोलिसांनी इनोव्हा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा समोरून येणाऱ्या स्कोडा कारला धडकली. यानंतर स्कोडाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली, जे नंतर चौथ्या कारला धडकले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. पोलीस सखोल तपास करत आहेत.