Palghar News – बोईसरमध्ये मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले!

पश्चिम रेल्वेच्या बोईसर स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अपघाताचा रेल्वेसेवेवर कोणताही परिणाम नाही. पालघर मार्गावरील सर्व रेल्वे सेवा सुरळीत सुरु असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.