मला बी दोषमुक्त करा! एकनाथ खडसेंचा कोर्टात अर्ज

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनीदेखील दोषमुक्ततेसाठी दाद मागितली आहे. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर ईडीचे उत्तर मागवले आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळय़ाप्रकरणी ईडीने खडसे दाम्पत्य व त्यांच्या जावयाविरुद्ध आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे हजर होते.