माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम, अजित पवार गटात जाण्याची शक्यता

मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि त्यांचे सुपुत्र व मुंबईतील वांद्रे-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

मी तरुणपणी काँग्रेसमध्ये सामील झालो आणि आज 48 वर्षांनी काँग्रेसची साथ सोडतोय. आज मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा प्रवास खूप छान होता, मला तो व्यक्त करायलाही खूप आवडले असते, मात्र काही गोष्टी आताच सांगणे योग्य नाही. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार, अशी पोस्ट बाबा सिद्दीकी यांनी केली आहे.