मनोहर जोशी पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या निवासस्थानापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी मनोहर जोशी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.