केजरीवाल मुख्यमंत्री निवास रिकामे करणार

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी नवी दिल्लीतील मंडी हाऊस भागातील निवास निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ते 4 ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवास रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टीने आज दिली. याआधी केजरीवाल यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री निवास रिकामे करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मुख्यमंत्री होण्यापूर्वी केजरीवाल गाझियाबादच्या काwशांबी भागात राहत होते. केजरीवाल यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मी लिटमस चाचणीसाठी राजीनामा दिला असून जोपर्यंत लोक मला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत मी पदावर परतणार नाही, असे ते म्हणाले होते.