महारेराच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौनिक यांनी आज अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी त्यांना मंत्रालयात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महारेराचे मावळते अध्यक्ष अजोय मेहता यांचा कार्यकाळ 20 सप्टेंबर रोजी संपत आहे. फेब्रवारी 2021मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची महारेराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मनोज सौनिक हे 1987च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. 30 एप्रिल 2023 रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. आठ महिन्यांनंतर ते नियुक्त झाले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.