Video – इंदापुरात भाजपच्या पडळकरांवर चप्पलफेक, मराठाविरोधी वक्तव्य भोवले

ओबीसी मेळाव्यात मराठाविरोधी वक्तव्य करणे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना आज चांगलेच भोवले. इंदापूर येथील मेळाव्यानंतर पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ओबीसी मेळावा संपल्यानंतर पडळकर दूध दरवाढीच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांची भेट घेण्यास निघाले होते. यावेळी पडळकर यांनी मेळाव्यात मराठाविरोधी भाषण केल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी त्यांना थांबवून जाब विचारला. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच वेळी त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. दरम्यान, पडळकर यांच्यावर त्यांच्याच लोकांनी चप्पल फेकल्याचे स्पष्टीकरण मराठा आंदोलकांकडून देण्यात आले. त्यांनी ओबीसी मेळाव्यात मराठाविरोधी वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.