खलिस्तानी दहशतवादी डल्लाच्या पाच शार्प शूटर्सना अटक

terrorist

दिल्लीतील मयूर विहारमध्ये रविवारी रात्री उशिरा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग डल्ला याच्या टोळीतील गँगस्टर्स आणि दिल्ली पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीनंतर डल्लाच्या पाच शार्प शूटर्सना अटक करण्यात आली. अर्श डल्लाच्या सूचनेवरून दोघेही पंजाबी गायक एली मंगतची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अर्श डल्लाच्याच सांगण्यावरून ऑक्टोबर महिन्यातही गायिका एली मंगतची हत्या करण्याचा डाव होता, परंतु तो घरी सापडला नाही. अक्षरधामच्या रस्त्यावर मयूर विहार येथे पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. गोळीबारात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर गरड येथे उपचार सुरू आहेत. गँगस्टर्समध्ये फिरोजपूरचा राजप्रीत सिंग राजा आणि भटिंडाचा भूटर वरिंदर सिंग विम्मीचा समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये परमजीत हत्या प्रकरणात राजा वॉण्टेड होता. त्याचवेळी मौद मंडी गोळीबार प्रकरणातही पोलीस वरिंदरचा शोध घेत होते.

पोलिसांनी थांबण्याचा केला इशारा
नोएडाहून दुचाकीवरून दोघे येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, परंतु पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या मागे गेले असता, त्यांनी उलट फिरून पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

कोण आहे एली मंगत
पंजाबमधील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला गायक एली मंगत हा मूळचा लुधियानाच्या दोराहा शहरातील रामपुरा गावचा रहिवासी आहे. त्याचे पूर्ण नाव हरकिरत सिंग मंगत असे आहे. दोहारा येथे बीए केल्यानंतर मंगत पॅनडाला गेला. पंजाबी गायक बब्बू मान यांना आपला आयकॉन मानले. मंगतने पंजाबी गायक करण औजला आणि दीप जड्डू यांच्या साथीने अनेक सुपरहिट गाणी दिली.

अर्शवर खंडणी, खुनाचे गुन्हे
गँगस्टर आणि खलिस्तान टायगर पर्ह्सचा हस्तक अर्शदीप सिंग गिल ऊर्फ अर्श डल्ला याला पेंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पंजाबमधील मोगा येथून पॅनडामध्ये गेलेल्या आणि तिथेच लपून बसलेल्या अर्शवर देश-परदेशात खून, खंडणी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.