जादूटोण्याच्या संशयावरून तीन महिलांसह पाच जणांची हत्या

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील एका गावामध्ये आज जादूटोण्याच्या संशयावरून पाच जणांची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील इटकाल गावामध्ये आज (15 सप्टेंबर 2024) मौसम कन्ना (34) मौसम बिरी हे पती-पत्नी आणि मौसम बुच्चा (34) व त्याची पत्नी मौसम आरजू (32) त्याचबरोबर करका लच्छी (43) या महिलेला बेदम मारहाण करण्यात करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी सवलम राजेश, सवलम हिडमा, करम सत्यम, कुंजम मुकेश आणि पोडियाम एंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.