आता झारखंडमध्ये पूल कोसळला

मागील काही दिवसांपासून नव्याने बांधलेले पूल कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने बिहारमध्ये नऊ दिवसांत पाच पूल कोसळले. यानंतर आता झारखंडमध्ये एक पूल कोसळला. हा पूल पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे.

झारखंडमधील गिरिडीहमध्ये अर्गा नदीवर पूल बांधायचे काम सुरू आहे. फतेहपूर आणि भेलवा घाटीदरम्यान बांधण्यात येणाऱया पुलामुळे गिरिडीह आणि जमुईला भाग जोडला जाणार आहे. मात्र बांधकाम पूर्ण होण्याआधी त्याचा काही भाग कोसळला. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा गर्डर तुटून पडला.