कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प समोरासमोर येणार; 10 सप्टेंबरला रंगणार दोन्ही नेत्यांमध्ये पहिली डिबेट, जगभराचे चर्चेकडे लक्ष

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पहिल्यादांच ट्रम्प आणि कमला हॅरिस एकमेकांसमोर येणार आहेत.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली डिबेट येत्या 10 सप्टेंबरला होणार आहे. ट्रम्प आणि कमला हॅरिस हे पहिल्यांदाच समोरासमोर येऊन एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी झालेल्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांचा पराभव केला होता. परंतु, बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर आता कमला हॅरिस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात 3 डिबेट (वादविवाद) होणार आहेत. ट्रम्प यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये  वादविवाद होणे खूप महत्त्वाचे आहे.

पहिली डिबेट 4 सप्टेंबर रोजी फॉक्स, 10 सप्टेंबर रोजी एबीसी आणि 25 सप्टेंबर रोजी एनबीसीशी वादविवाद करण्यास सहमती दर्शविली आहे. डिबेटसाठी स्थान काय असेल आणि किती लोक असतील. या सर्व गोष्टींवर चर्चा केली जात आहे. या तिन्ही चर्चेसाठी इतर पक्षाच्या (कमल हॅरिस) संमतीची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले रेकॉर्ड दुरुस्त करण्यासाठी आपण चर्चेला उपस्थित असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

मी डिबेटची वाट पाहतेय

ट्रम्प यांनी वादविवादांना सहमती दिल्याचा मला आनंद झाला. मी या डिबेटची आतुरतेने वाट पाहत आहे. मला आशा आहे की ट्रम्प चर्चेसाठी येतील. उर्वरित चर्चेसाठी आपण तयार आहात का, असे विचारले असता, 10 सप्टेंबरनंतर आपण आणखी एका चर्चेसाठी तयार असल्याचे कमला यांनी सांगितले.

ट्रम्प यांचा कमला हॅरिसवर हल्ला

कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार होण्यासाठी आवश्यक मतेही मिळाली नाहीत आणि आता त्या निवडणूक लढवत आहेत. हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष असताना कोणती कामगिरी केली आहे हे अमेरिकेतील जनतेला चांगले ठाऊक आहे. अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.