पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. शुक्रवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने काही वेळात आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत नाही.