लोअर परळ वर्कशॉपमधील उभ्या एक्स्प्रेसच्या डब्याला आग

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे ट्रेनचे दोन डबे जळून खाक झाले. दरम्यान, या दुर्घटनेत वर्कशॉपमधील कोणताही कर्मचारी जखमी झालेला नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.