आंध्र प्रदेशातील अनकापल्लीत एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट; 4 जणांचा मृत्यू तर, 20 जखमी

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतपुरम सेझमधील Escientia या फार्मास्युटीकल कंपनीमध्ये रिएक्टरचा स्फोट झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या गंभीर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना आज (21 ऑगस्ट) दुपारी घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना पुढील उपचारांसाठी अनकापल्ली येथील NTR रुग्णालयात आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये भरती केले आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.