खड्डा बुजवल्यानंतर दोन तासांत वाहतूक; रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक, जिओ पॉलिमर आणि मायक्रो सरफेसिंग, सात झोनसाठी 106 कोटींचा खर्च

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पालिकेने या वर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, दुरुस्ती-डागडुजीची कामे मास्टिक, जिओ पॉलिमर आणि मायक्रो सरफेसिंग अशा तंत्रज्ञानांनी करण्यात येणार आहे. यामुळे दुरुस्तीच्या कामानंतर फक्त दोन तासांत संबंधित रस्त्यावरून प्रवास करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या सात झोनसाठी किमान 10 कोटी याप्रमाणे 106 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रस्ते विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडत असल्याने पालिकेला मोठय़ा टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना पालिकेला शहरातील रस्ते कामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची स्थिती आहे. तर पूर्व-पश्चिम उपनगरातील रस्त्यांची फक्त 20 टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे शिल्लक दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा या कर्षी खड्डय़ात जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने खड्डे बुजवणार आहे. यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे नवे तंत्रज्ञान

पूर्क मुक्त द्रुतगती मार्गाकर ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाने रस्त्याचे काम मजबूतरीत्या करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाने रस्त्याचे काम केल्यानंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू करता येते. तर जिओ पॉलिमर तंत्रज्ञानात खड्डय़ाच्या जागीच मटेरियल तयार करून तातडीने खड्डा भरला जातो. सिमेंट रस्त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. 2 तासांत हे मटेरियल सुकल्यानंतर वाहतूक सुरू करता येते. ‘हेवीवेट’ वाहनांची काहतूक असणाऱया रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. 1 चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी 5 हजारांचा खर्च येतो.

मास्टिक तंत्रज्ञानाचा फायदा

मुंबईतील रस्त्यांची पावसाळय़ाआधी दुरुस्ती, खड्डे बुजकण्याचे काम करताना केकळ खड्डे न बुजवता जास्तीत जास्त मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केकळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येईल. मास्टिक डांबरीकरणात 180 ते 200 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्कात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरल्यामुळे कोल्डमिस्कऐकजी मास्टिक अस्फाल्टचा कापर करण्यात येणार आहे.