गे लव्ह स्टोरी दाखवल्याने पाकिस्तानी Barzakh शो पडला बंद; प्रेक्षकांची प्रचंड नाराजी

पाकिस्तानी शो ‘बरजाख’ हा सध्या त्याच्या कंटेंटमुळे भरपूर चर्चेत आला आहे. या शोमध्ये फवाद खान आणि सनद सईद हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत आहे. या शोमध्ये समलिंगि लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी प्रेक्षकांकडून या शोबाबत नाराजी व्यक्त केली जातेय. त्यामुळे प्रेक्षकांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली. दरम्यान पाकिस्तानात होणारा विरोध आणि टीकेनंतर ‘जिंदगी’ चॅनलने ‘बरजाख’ हा शो यूट्यूबवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

झी झिंदगीने हा शो बंद करण्याबाबत आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्ही टीम बरजाख आणि झी जिंदगी प्रेक्षकांकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल कृतज्ञ आहोत. हा शो सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी बनवण्यात आला होता. मात्र या शो म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही 9 ऑगस्ट 2024 रोजी YouTube वरून Barzakh हा शो हटवण्याचा निर्णय घेतला आहे’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZINDAGI (@zindagiofficial)

Barzakh या शोचे एकूण सहा भाग आहेत. या शोमधून डिप्रेशन, आत्महत्या यासारख्या अनेक सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शोच्या तिसऱ्या भागात ‘गे लव्हस्टोरी’ आणि ‘रोमान्स’ दाखवण्यात आला होता आणि शोमध्ये इंटिमेट सीनही दाखवण्यात आले होते. शोमध्ये समलिंगी जोडप्याची भूमिका सैफुल्ला (फवाद एम. खान) आणि लोरेन्झो बने फ्रँको यांनी केली आहे. या शोमध्ये दोघांमध्ये बरीच जवळीक दिसून आली. 6 ऑगस्ट रोजी या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला होता.