अग्निवीर योजना रद्द करा, सेवेवर असताना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला पेन्शन द्या! कुमार यांच्या कुटुंबीयांची मागणी

agnivir ajay kumar father

अग्निवीर अजय कुमार यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय लष्कराकडे त्यांना ‘hero’ दर्जाची मागणी केली आहे. कुटुंबाचं म्हणणं आहे की, नुकसान भरपाईची रक्कम अजय कुमार यांची जागा घेऊ शकत नाही.

खासगी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीसोबत अजय कुमार यांनी संवाद साधला. यावेळी ‘अग्निवीर योजना रद्द करा, तसेच आम्हाला आम्हाला पेन्शन आणि कॅन्टीन कार्ड मिळावे’, अशी मागणी त्यांच्या वडिलांनी केली.

अजय कुमार यांच्या बहिणीनं देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भावाच्या जीवाच्या बदल्यात भरपाई कितीशी पुरणार अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्या भावाला चार वर्षांच्या नोकरीसाठी जीव गमवावा लागला. सरकार ₹ 1 कोटी देण्याचे आश्वासन देते, मात्र व्यक्तीशिवाय एखादे कुटुंब केवळ या रकमेवर जगू शकते का?’ असा प्रश्न त्यांनी केला. तसेच अग्निवीर योजनेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

‘सरकारने आम्हाला पैसे दिले आहेत, परंतु त्यांनी ही योजना बंद करावी अशी आमची इच्छा आहे’, असंही त्या स्पष्ट शब्दात म्हणाल्या.

2022 मध्ये सुरू करण्यात आलेली, अग्निवीर योजना सशस्त्र दलांमध्ये अल्पकालीन सेवेसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. अग्निवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्ती सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब पेन्शनसारख्या नियमित लाभांसाठी पात्र नाहीत.

या मुद्द्याने देशभरात पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे, यापूर्वी संसदीय पॅनेलने अशी शिफारस केली होती की कर्तव्यावर मरण पावलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबांना नियमित लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पुरविल्या जाणाऱ्या लाभांइतकेच लाभ मिळावेत.

कुटुंबाला 98 लाख रुपये मिळाले असले तरी लष्कराकडून केवळ 48 लाख रुपयेच मिळाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. कुटुंबाला 98.39 लाख अदा करण्यात आल्याच्या लष्कराच्या विधानाच्या विरुद्ध हे विधान आहे.

बुधवारी रात्री उशिरा केलेल्या निवेदनात, लष्कराने सोशल मीडियावर फिरत असलेल्या दाव्याचे खंडन केलं की कुटुंबाला निश्चित करण्यात आलेली भरपाई मिळाली नाही. त्यांनी दावा केला की अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला एकूण ₹ 98.39 लाख वितरित केले गेले आहेत.

यासंदर्भात लष्करानं एक अधिकृत पोस्ट लिहिली आहे. ‘अग्निवीर अजय कुमारने केलेल्या सर्वोच्च बलिदानाला हिंदुस्थानचं सैन्य सलाम करते. एकूण देय रकमेपैकी, अग्निवीर अजयच्या कुटुंबाला आधीच ₹ 98.39 लाख दिले गेले आहेत. एक्स-ग्रॅशिया आणि इतर फायदे अंदाजे 67 लाख इतके आहेत. अग्निवीर योजनेच्या तरतुदींनुसार लागू, पोलीस पडताळणीनंतर लवकरच अंतिम खाते सेटलमेंटवर दिले जाईल, एकूण रक्कम अंदाजे ₹ 1.65 कोटी असेल’, असं लष्करानं एका निवेदनात म्हटलं आहे.

कुटुंबाने आपल्याला 98 लाख मिळाल्याचं सांगितलं. मात्र त्याच वेळी स्पष्ट केलं की 50 लाख विमा पॉलिसीचे आहेत.

‘प्रथम, आम्हाला आयसीआयसीआय बँकेकडून 50 लाख विम्याचे पैसे मिळाले. त्यानंतर आम्हाला लष्कराकडून 48 लाख रुपये मिळाले. आम्हाला अद्याप पूर्ण रक्कम मिळालेली नाही. लष्कराने आम्हाला सांगितले आहे की ते आम्हाला 60 लाख रुपये आणखी देतील. आम्ही ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत, आम्हाला ते कधी मिळतील हे माहित नाही’,असंही ते म्हणाले.