जगभरातून बातम्यांचा आढावा

सोने-चांदीच्या दरात घसरण
सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचे दर 1 तोळा 70 हजार रुपयांवर आले असून एक किलो चांदीचे दर 86,625 रुपये झाले आहेत. गुरुवारी सोन्याच्या दरात 130 रूपयांची घट झाली तर चांदीचे दर 385 रुपयांनी खाली आले. जागतिक बाजारातही सोन्याचे दर खाली आल़े

उष्माघातामुळे कराचीत 450 जणांचा मृत्यू
पाकिस्तानात उष्णतेचा कहर सुरू असून एकटय़ा कराची शहरात चार दिवसांत 450 लोकांचा मृत्यू झाला आहे. दररोज शेकडो लोक रुग्णालयात दाखल होत असून मागील दोन दिवसांत तीन सरकारी रूग्णालयातून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कराची शहरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे.

टाटांनी मागितली मुंबईकरांकडे मदत
उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईकर यांच्याकडे एक मदत मागितली आहे. ही मदत म्हणजे श्वानाच्या उपचारासाठी असून मला तुमची मदत हवी आहे, असे टाटा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. अवघ्या सात महिन्यांच्या श्वानाला रक्ताची गरज आहे. त्याला ताप आणि जीवघेणा ऑनिमिया झाला आहे. मदत करण्यासाठी 7021850400 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहा वर्षांनी ऑर्डर मिळाली
ग्राहकाने लॉकडाऊनच्या आधी फ्लिपकार्टवरून चप्पल मागवली होती. सहा वर्षांनंतर पंपनीच्या कस्टमर केअरने पह्न करून ग्राहकाला त्याचा अनुभव विचारला. ग्राहकाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

चीनचे मून मिशन फत्ते; चांगई-6 परतले
चीनचे मून मिशन फत्ते झाले असून चीनचे अंतराळ यान चांगई-6 मंगळवारी चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुन्यांसह पृथ्वीवर परतले आहे. चीनचे यान 1 जून रोजी चीनच्या पृष्ठभागावर उतरले होते.

आदिती राव हैदरी विमानतळावर अडकली
बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी विमानतळावर अडकली. तेसुद्धा एक-दोन तास नव्हे तर तब्बल 32 तास. ही माहिती स्वतः आदितीने सोशल मीडियावरून दिली आहे.

श्रद्धा कपूरचे 90 मिलियन फॉलोअर्स
अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर 90.1 मिलियन फॉलोअर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. श्रद्धाने फॉलोअर्समध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट्ट या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

25 टक्के विवाहित महिलांना नोकरी
हिंदुस्थानातील आयपह्न उत्पादक पंपनी फॉक्सकॉन वादाच्या भोवऱयात सापडली. प्लांटवर विवाहित महिलांना नोकरी न दिल्याचा पंपनीवर आरोप होतोय. याप्रकरणाची पेंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने गंभीर दखल घेऊन तामिळनाडूच्या श्रम विभागाकडे अहवाल मागवला. या सर्व पार्श्वभूमीवर आता ‘फॉक्सकॉन’ने एक निवेदन जारी केले.

फॉक्सकॉन कंपनीचे स्पष्टीकरण
पेंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने याप्रकरणी तामिळनाडूच्या श्रम विभागाकडे अहवाल मागवला. त्यानंतर पंपनीने विवाहित महिला कामगारांची संख्या किती आहे, ते सांगितले. पंपनीमध्ये 70 टक्के महिला कर्मचारी असून त्यामध्ये 25 टक्के विवाहित महिला असल्याचे ‘फॉक्सकॉन’ ने स्पष्ट केले.

हिंदुस्थानींनी मायदेशी पाठवले 120 अब्ज डॉलर
परदेशात राहणाऱ्या हिंदुस्थानींनी वेगळाच रेकॉर्ड केला आहे. गेल्या वर्षभरात परदेशातील हिंदुस्थानींनी मायदेशात 120 अब्ज डॉलर पाठवले. याबाबत हिंदुस्थानींनी चीन आणि मेक्सिकोलाही मागे टाकले. परदेशातून पाठवलेल्या पैशांबद्दल (रेमिटन्स ) जागतिक बँकेने बुधवारी अहवाल दिला. या अहवालानुसार, विदेशातील हिंदुस्थानींनी मायदेशी पैसे पाठवण्याचे प्रमाण 2023 साली 7.5 टक्क्यांनी वाढले आहे. याचा अर्थ ंिहदुस्थानी दर मिनिटाला सुमारे दोन कोटी रुपये देशात पाठवतात. मेक्सिकोला 66 अब्ज डॉलर, चीनला 50 अब्ज डॉलर, फिलीपीन्सला 39 अब्ज डॉलर आणि पाकिस्तानला केवळ 27 अब्ज डॉलर पाठवले गेले आहेत. पाकिस्तानच्या बाबत निराशाजनक परिस्थिती दिसून येतेय.

लंडनमध्ये अर्धा डझन आंब्यांची किंमत 2400 रुपये
हिंदुस्थानात मिळणाऱया वस्तू विदेशात किती रुपयाला मिळत असतील असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. लंडनमध्ये राहणाऱया एका हिंदुस्थानी मुलीने थेट लंडन मार्पेटमध्ये जाऊन तेथील किमती सांगितल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनमध्ये सहा आंब्यांची किंमत 2400 रुपये, भेंडी 600 रुपये किलो, कारले 1 हजार रुपये किलो, 20 रुपयांचे चिप्स पॅकेट 95 रुपयांना मिळते. या व्हिडीओला आतापर्यंत 6.2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर वेगवेगळय़ा कमेंट पाहायला मिळत आहेत. कमाई पाऊंडमध्ये असेल तर खाद्यपदार्थांसाठीही किंमत पाऊंडमध्ये मोजावी लागेल, अशी कमेंट एका युजरने केली आहे.