मनोरमा नेत्रालयाने शेकडो रुग्णांना दिली नवी दृष्टी

मनोरमा नेत्रालय मुलुंडच्या वतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांनी स्वतः तब्बल 297 रुग्णांची तपासणी केली. त्यातील 135 जणांना चष्मा घेण्यासाठी नंबर काढून देण्यात आला. त्यापैकी 75 रुग्णांना मोतिबिंदू असल्याचे निदान झाले. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी रुग्णांना संजिवनी सामाजिक ट्रस्टच्या वतीने मुंबईत नव्याने सुरू करण्यात आलेल्या मनोरमा नेत्रालयात आणण्यात आले. येथे फेपह्ईमसिफिकेशन तंत्राच्या सहाय्याने पह्ल्डेबल लेन्स बसवून शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी स्वतः केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. रागिणी पारेख यांनी स्वतः मुरूड येथे जाऊन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी केली. यासाठी मनोरमा रुग्णालयातील सर्व चमू तसेच विजय सुर्वे, प्रमोद भायदे, दीपा, संदेश आणि सर्व संजिवनी संस्था मुरुड यांचे सहकार्य लाभले.