दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणारा गजाआड; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत खंडणी मागणाऱया एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती.

इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इम्रानविरोधात गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्याने फसवणूक, धमकावणे, लाखो रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी त्या महिलेने तक्रार दिली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, एपीआय मारुती कदम, उपनिरीक्षक लेम्बे तसेच थोरात, पंद, सुर्वे व पथकाने सोमवारी रात्री खानला त्याच्या राहत्या घरातून उचलले. त्याने दाऊदचा माणूस असल्याचे सांगत अनेकांना धमकावले होते. त्याने अशा प्रकारे अनेकांकडून खंडणी उकळली असण्याची दाट शक्यता आहे. तो दाऊद टोळीतील कोणाच्या संपका&त आहे. तसेच त्याने कोणा कोणाला धमकावून खंडणी वसूल केलीय याचा पोलीस शोध घेत आहेत.