दहीहंडीच्या सरावाला ‘अधिक मासा’चा थर; विक्रम रचण्यासाठी महिला गोविंदा पथकांचाही निर्धार

>> मंगेश मोरे

गोपाळकाला सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईकर गोिंवदांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दहीहंडीच्या सरावासाठी ‘अधिक मास’चा योग आला आहे. सर्वसामान्यपणे गोिंवदांना सराव करायला एक ते सव्वा महिना मिळतो. यंदा गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू झालेला सराव दोन महिने चालणार आहे. पुरुषांबरोबरीने सरावासाठी मैदानात उतरलेल्या महिला गोिंवदा पथकांनी ‘अधिक मास’च्या संधीचे सोने करीत सात थरांचा विक्रम रचण्याचा निर्धार केला आहे.

दहीहंडी हा मुंबईकर तरुण-तरुणींच्या साहसाचे दर्शन घडवणारा सण. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशविदेशातही मुंबईच्या गोिंवदांचा साहसी थरांचा उदोउदो होतो. कोरोना महामारीच्या दोन वर्षांत या सणावर आलेले नैराश्येचे सावट पूर्णपणे हटले आहे. मुंबईकर गोिंवदा मोठ्या हिमतीने, नव्या जोशाने दहीहंडी सरावाच्या मैदानात उतरले आहेत. मुंबई शहर परिसरासह पूर्व व पश्चिम उपनगरे तसेच ठाणे शहरात गोिंवदा पथकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. थरांचा थरथराट स्वत: अनुभवण्यासाठी नवनवे गोिंवदा तयार होत आहेत. त्यामुळे यंदा गोिंवदा पथकांची संख्या नक्कीच लक्षणीय वाढेल, असा विश्वास जोगेश्वरीच्या जय जवान गोिंवदा पथकाचे प्रमुख प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला. आमच्या दहीहंडीचा सराव जोरदार सुरू झाला आहे. दररोज नवनवीन तरुण मंडळी आमच्या पथकाच्या सरावसत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत. तरुणांना दहीहंडीच्या थरांचे प्रचंड आकर्षण आहे. अशा हौशी गोिंवदांनी ‘अधिक मास’मुळे मिळालेल्या अधिक अवधीत मेहनत घेऊन पुरेसा सराव केल्यास निश्चितच गोिंवदा पथकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे मत ढवळे यांनी व्यक्त केले.

पुरुष गोिंवदांसह महिला गोिंवदाही विक्रमी थर लावण्याच्या निर्धाराने विशेष मेहनत घेत आहे. अनेक महिला, तरुणी रोजचे कार्यालय आणि घरचे शेड्युल सांभाळून न चुकता दहीहंडी सरावाला हजेरी लावत आहेत. महिलांनी अशा साहसी खेळांमध्ये आवर्जून सहभागी व्हायलाच हवे. ही काळाची गरज बनली आहे. अनेक तरुणी आमच्याशी संपर्क साधून महिला गोिंवदा पथकांचे जाळे विस्तारण्यास हातभार लावत आहेत. त्यांच्या माध्यमातून महिला गोिंवदा मुंबई, ठाण्यात सात थरांचा नवीन विक्रम रचणारच, असा निर्धार विलेपार्ले येथील पार्ले स्पोटर््स क्लब महिला गोिंवदा पथकाच्या प्रमुख गीता झगडे यांनी व्यक्त केला.

उत्सव आयोजकांनी महिला गोिंवदांनाही प्रोत्साहन द्यावे!

दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. आता कबड्डीसारखे सुगीचे दिवस यावेत, यासाठी महिला गोिंवदांनीही पुरुषांच्या बरोबरीने बहुसंख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी झाले पाहिजे. याकामी उत्सव आयोजकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई, ठाण्यातील उत्सव आयोजकांनी महिला गोिंवदांसाठी विशेष दहीहंड्यांचे आयोजन करावे. पुरुष गोिंवदांप्रमाणेच महिलांनाही प्रोत्साहन द्यावे, गोिंवदांचा देशविदेशातील दबदबा कायम राखण्याची क्षमता महिला गोिंवदांमध्ये आहे. त्यांना सरकार व उत्सव आयोजकांच्या पाठबळाची गरज आहे, अशी भावना महिलांमधून व्यक्त केली जात आहे.

विमा संरक्षणावर दरवाढीचे सावट

मुंबई-ठाण्यातील गोिंवदांना ओरिएंटल विमा कंपनीकडून विमा संरक्षण पुरवले जाते. या योजनेत दहीहंडी सरावापासून ते दहीहंडी सणाच्या दिवसापर्यंत गोिंवदांना अपघाती मृत्यूसाठी १० लाखांचे तर दुखापत झाल्यास ५ लाखांचे विमा कवच मिळते. यासाठी गेल्या वर्षी प्रतिगोिंवदा ७५ रुपये इतका प्रीमियम आकारण्यात आला होता. यंदा हा प्रीमियम १०० रुपयांच्या घरात जाण्याचे संकेत विमा कंपनीने दिले आहेत. मात्र कंपनीने प्रीमियममध्ये मोठया प्रमाणावर वाढ न करता गोिंवदा पथकांना दिलासा द्यावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीतर्पेâ केले जाणार आहे. तसेच गोिंवदांच्या सुरक्षेची खबरदारी सरकारने घ्यावी आणि गोिंवदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यासंदर्भात लवकरच दहीहंडी समन्वय समितीचे शिष्टमंडळ आपल्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सरकारदरबारी दाद मागणार आहे.

सध्या मुंबई आणि ठाणे शहरात ४०० हून अधिक महिला गोिंवदा पथके आहेत. यंदा ‘अधिक मास’मुळे थर रचण्याचा सराव करण्यासाठी जास्त वेळ मिळाला आहे. या सरावसत्रांमध्ये अधिकाधिक नवीन महिला गोिंवदा घडले जातील. त्यामुळे महिला गोिंवदा पथकांची संख्या ५०० ते ५५० च्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत