मुंबई पालिका, रेल्वेत लिपिक पदासाठी नोकरभरती प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा उपक्रम

मुंबई महापालिकेतील 1846 लिपिक पदांसाठी आणि रेल्वेतील लिपिक तसेच विविध पदे मिळून एकूण 11558 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आणि या स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, शिवसेना नेते अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नोकरभरती प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधी 8 ते 10 दिवसांचा असणार आहे. ज्या उमेदवारांना या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घ्यायची इच्छा असेल त्यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत शिवसेना भवन येथे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999) यांच्याशी सायंकाळी 6 ते रात्री 8.30 यावेळेत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे आवाहन महासंघाचे संघटन सचिव उमेश नाईक यांनी केले आहे.