सेनक तोसुनने (90+4) स्टॉपेज टाईममध्ये गोल करीत झेक प्रजासत्ताकवर 2-1 गोलफरकाने मात करीत आपल्या तुर्की संघाला युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचविले. 20 मिनिटांनंतर दहा खेळाडूंनिशी खेळल्याचाही फटका झेक प्रजासत्ताकला बसला.
तुकाaकडून हकान चाल्हानोग्लूने 51 व्या मिनिटाला गोल करीत आपल्या संघाचे खाते उघडले, मात्र टॉमस सौसेकने 66 व्या मिनिटाला गोल करीत झेक प्रजासत्ताकला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र सेनक तोसुनचा स्टॉपेज टाईममधील गोल निर्णायक ठरला. लढतीत 20 व्या मिनिटाला झेक प्रजासत्ताकच्या एंटोनिन बराकला पंचांनी लाल कार्ड दाखविले. स्टॉपेज टाईममध्येही (90+8) झेक प्रजासत्ताकच्या टॉमस चोरीलाही लाल कार्ड मिळाले. त्यामुळे या संघाला लढतीत पुन्हा बरोबरी साधता आली नाही. या चुरशीच्या लढतीत पंचांनी खेळाडूंना तब्बल 18 वेळा (2 लाल कार्ड, 16 पिवळे कार्ड) कार्ड दाखविले.
युरो चषक बाद फेरीचा कार्यक्रम
दिनांक संघ ठिकाण वेळ
29 जून स्वित्झर्लंड वि. इटली बर्लिन 21.30
30 जून जर्मनी वि. डेन्मार्क डॉर्टमंड 00.30
30 जून इंग्लंड वि स्लोवाकिया गेलसेनकिर्चेन 21. 30
1 जुलै स्पेन वि. जॉर्जिया कोलोन 00.30
1 जुलै फ्रान्स वि. बेल्जियम डसलडर्फ 21.30
2 जुलै पोर्तुगाल वि. स्लोव्हेनिया फ्रँकफर्ट 00.30
2 जुलै रोमानिया वि.नेदरलॅण्ड्स म्युनिक 21.30
3 जुलै ऑस्ट्रिया वि. तुकाa लिपझिग 00.30