वैद्यकीय खर्चासाठी पीएफमधून 1 लाख रुपये काढता येणार

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱयांना मोठा दिलासा आहे. आता कर्मचारी आजारपणासाठी पीएफ खात्यातून 1 लाखापर्यंतची रक्कम काढू शकतात. यापूर्वी कर्मचारी केवळ 50 हजार रुपये काढू शकत होते. त्यानंतर आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या नवीन नियमांमुळे पीएफ खातेधारकांना फायदा होणार आहे. ही सुविधा ईपीएफ फॉर्म 31 अंतर्गत देण्यात आली आहे. 16 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भविष्य निधी योजनेत पॅरा 68जे अंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या पुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढले जाऊ शकतात.

कर्मचारी किंवा त्यांच्या पुटुंबातील व्यक्ती 1 महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात असेल किंवा मोठी शस्त्रक्रिया, टीबी, कर्परोग यांसारख्या गंभीर परिस्थितीत पैसे काढता येतील. जर तुमच्या पीएफ खात्यात एवढी रक्कम असेल तर तुम्ही 1 लाखापर्यंत पैसे काढू शकता. 1 लाखाहून कमी रक्कम असेल तर त्यानुसार पैसे काढता येतील.

n ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी ईपीएफओ फॉर्म 31 भरावा लागतो. याअंतर्गत लग्न, घर बांधकाम, घर खरेदी किंवा वैद्यकीय खर्चांसाठी पैसे काढता येतात. पैसे काढण्यासाठी कर्मचाऱयाला कंपनीकडे वैद्यकीय कागदपत्रे सादर करावी लागतील. ईपीएफओच्या अधिपृत वेबसाईटवर यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.