एलॉन मस्क यांनी मुलांसाठी खरेदी केले 294 कोटी रुपयांचे आलिशान घर

स्पेस एक्स आणि टेस्ला या जगविख्यात कंपन्यांचे मालक एलॉन मस्क 11 मुलांचे पिता आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मस्क यांना त्याच्या 11 मुलांना एकाच घरात ठेवायचे आहे. त्यांच्या 11 मुलांचे एकाच छताखाली संगोपन व्हाव अशी त्यांची ईच्छा आहे. यासाठी मस्क एक आलिशान घर घेण्याचा विचार करत आहेत. हे घर त्यांच्या स्वत: च्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. या घरात त्यांची 11 मुले त्यांच्या आईसोबत राहतील.

एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्क 14,400 स्क्वेअर फूटचा बंगला खरेदी करत आहे. या आलिशान घरात त्यांची 11 मुले त्यांच्या आईसोबत राहणार आहेत. ही मालमत्ता एलोन मस्कच्या घराजवळ असल्याने मस्क आपल्या मुलांसोबत वेळ घालवू शकणार आहे. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत सुमारे 294 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन नावाच्या ठिकाणी मस्क याने ही मालमत्ता खरेदी केली आहे.