काळय़ा पैशांवर आयोगाचा ‘कडक वॉच’

निवडणुकीत होणाऱया काळय़ा पैशाच्या वापराबाबत चिंता व्यक्त करीत गुन्हेगारी, चुकीच्या बातम्या आणि आचारसंहिता भंग अशी आव्हाने असल्याचे यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले, मात्र यावेळी काळय़ा पैशावर कडक वॉच राहणार असून दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राजीव कुमार यांनी दिला.

2022-23 च्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत 11 राज्यांमध्ये रोख जप्तीचे प्रमाण 800 टक्क्यांपेक्षा वाढले असल्याचेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. या काळात 3 हजार 400 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अंमलबजावणी एजन्सींना बेकायदेशीरपणे पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तू वाटणाऱयांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंमलबजावणी यंत्रणांना असे आहेत निर्देश

z दारू, रोख रक्कम, ड्रग्ज वितरणावर लक्ष ठेवणे
z मोफत वस्तूंच्या बेकायदेशीर वितरणावर कारवाई करणे
z बेकायदेशीर ऑनलाइन रोख हस्तांतरणावर कडक लक्ष ठेवणे
z सूर्यास्तानंतर बँकेच्या वाहनांमधून रोकड नेणाऱयांवर कारवाई
z अनुसूचित नसलेल्या चार्टर्ड फ्लाइटची देखरेख आणि तपासणी

सोशल मीडिया म्हणजे झूठ का बाजार…

सोशल मीडियाचा वापर राजकीय पक्षांनी काळजीपूर्वक करावा. अफवा, चुकीच्या बातम्या पसरविल्यास आयोगाकडून कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर अश्लाघ्य, असभ्य भाषेचा वापर, टिप्पणी करणाऱया पोस्ट हटविण्यात येतील. सोशल मीडिया वापरताना मर्यादा पाळा. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नका, कारण येथे ‘झूठ के बाजार में रौनक बहोत हैं लेकीन…’ असे राजीव कुमार म्हणाले.