राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार यावं!

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये गेल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्याप त्यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. अधिकृत पक्ष प्रवेश कधी होणार असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. परंतु आता खडसे यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावं. मागील काही महिन्यांपासून महायुती सरकारचा अनुभव चांगला वाटत नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. सूडबुद्धीने ईडी, सीबीआय करवाई करत आहेत. जनतेची कामे होताना दिसत नाही.’’ असे खडसे म्हणाले.