अखेर पालिका कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला झाला, आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या काही महिन्यांपासून 1 तारीखला होत नसल्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत होता. मात्र याबाबत शिवसेना नेते- युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केल्यानंतर आज 1 तारखेलाच पालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 90 हजारापेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 1 तारीखला होतो, मात्र यावेळी गेल्या काही महिन्यांपासून 2 ते 3 तारीखला पगार खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले होते. महिन्याच्या 1 तारीखला पगार होतो म्हणून अनेक कर्मचाऱ्यांच्या घराच्या हप्ते तारीखचेच आहेत. तर सोसायटी मेंटेनन्स, शाळांच्या ‘फी’चा चेकही 1 तारखेचा दिला जातो. मात्र सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारीखला होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने बँका-संस्थांकडून दंड आकारण्याचे प्रकारही घडले होते.