गृहमंत्र्यांच्या नागपुरात ड्रग्ज फॅक्टरी, डीआरआयची कारवाई; तिघांना अटक

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिह्यात नागपूर येथे सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने उद्ध्वस्त केली आहे. नागपूरच्या पाचपावली इमारतीमधील एका घरात ही फॅक्टरी सुरू होती. ड्रग्जप्रकरणी डीआरआयने तिघांना अटक केली. ते त्या सिंडिकेटमध्ये मुख्य सूत्रधार, फायनान्सर आणि कॅरिअरचा समावेश आहे. मेफेड्रॉन निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य असलेली प्रयोगशाळा घरात सुरू केली होती. मुख्य सूत्रधाराने प्रयोगशाळेसाठी लागणारा संच खरेदी केला. त्या प्रयोगशाळेत 100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा मालदेखील जप्त केला आहे.

नागपुरात एकजण ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने पाचपावली इमारत परिसरात सापळा रचला. त्यानंतर आज डीआरआयने त्या इमारतीत शोधमोहीम हाती घेतली.

शोधमोहिमेदरम्यान डीआरआयचे पथक एका घरात गेले. तेथे त्याना ड्रग निर्मितीचा कारखानाच दिसला. या टोळीने आधीच द्रव्य स्वरूपात 50 किलोपेक्षा अधिक मेफेड्रॉन तयार केले होते. ती पावडर स्वरूपात उत्पादन बाहेर आणण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. डीआरआयने कारवाई करून 78 कोटी रुपये किमतीचे सुमारे 51.95 किलो ड्रग्ज जप्त केले. ड्रग्जप्रकरणी डीआरआयने तिघांना अटक केली. ते त्या सिंडिकेटमध्ये मुख्य सूत्रधार, फायनान्सर आणि पॅरिअर याचा समावेश आहे. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना डीआरआय कोठडी सुनावली आहे.

z मेफेड्रॉन निर्मितीसाठी लागणारी आवश्यक सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामुग्री त्या ड्रग्जच्या कारखान्यात होती. मुख्य सूत्रधाराने ड्रग्ज निर्मितीसाठी तो संच खरेदी केला. त्यानंतर ड्रग्जचा कारखाना उभा केला. 100 किलोपेक्षा अधिक जास्त मेफेड्रॉन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा मालदेखील मिळवला होता.