हे पदार्थ खाल्लेत तर डोकं दुखायला लागेल, औषधांनीही होत नाही परिणाम

थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. या ऋतूत खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावे लागते. आपण काय खावे हे बर्‍याच लोकांना माहिती असते, पण या ऋतूत काय खाऊ नये हे फार कमी लोकांना माहिती असते. जर तुम्हाला थंडीच्या काळात चांगले आरोग्य राखायचे असेल आणि प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर काही गोष्टींपासून अंतर राखणे गरजेचे आहे. कारण लोकांना या ऋतूमध्ये सर्दी, फ्लू आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

थंडीमध्ये डोकेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यावर हा त्रास अजून वाढतो. अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनने म्हटले आहे की थंड हवामान आणि कमी सूर्यप्रकाशामुळे रक्तदाबावर परिणाम होत असतो ज्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

थंडीच्या काळात थंड पेयांव्यतिरिक्त, फळांचे रस, गोड पेये आणि गॅस निर्माण करणारे पेय टाळावे. या पेयांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याऐवजी ताजी फळे खाण्याचा प्रयत्न करा.​

 थंडीपासून वाचण्याचे उपाय

1. हिवाळ्यात तुम्ही बाहेर पडत असाल तेव्हा उबदार कपड्यांनी तुमचे डोके झाका.
2. पुरेसे पाणी प्या
3. खोलीत एक ह्युमिडिफायर ( खोलीतील दमटपणा वाढवणारे साधन) लावा.
4.व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ पुरेशा प्रमाणात खा.
5. पुरेशी झोप घ्या आणि पोषक आहार मिळेल याची काळजी घ्या.
6.नियमित व्यायाम करा.
7.चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स यांसारखे कॅफिनचे सेवन करू नका.