शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, डॉ. राहुल पाटील यांची विजयी हॅट्ट्रीक; 34 हजारांची लीड

शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल पाटील यांनी अखेर परभणीचा गड राखला. महायुतीच्या विरोधी उमेदवाराचा 34 हजार 214 मतांनी पराभव केला. परभणी विधानसभा क्षेत्रात डॉ. राहुल पाटील यांना 1 लाख 26 हजार 791 मते पडली. तर विरोधी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांना 92 हजार 577 मते पडली. आमदार डॉ. पाटील यांनी परभणी विधानसभेतून तिसर्‍यांदा विजय मिळवून हॅट्ट्रीक साधली.

शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मत मोजण्यात आले. यामध्ये आमदार डॉ. राहुल पाटील यांना 1 हजार 920 मते पडली. आनंद भरोसे यांना 1 हजार 246 मते पडली. परभणी विधानसभेत मतमोजणीच्या 25 फेर्‍या झाल्या. अंतीम मतमोजणीनंतर आमदार डॉ. राहुल पाटील यांना 1 लाख 26 हजार 791 मते पडली. तर आनंद भरोसे यांना 92 हजार 577 मते पडली. आमदार डॉ. पाटील यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.