यापुढे कमला हॅरिस यांच्यासोबत डिबेट नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी कमला हॅरिस यांच्यासोबत कोणत्याही डिबेटमध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प म्हणाले की, जेव्हा एखादा खेळाडू सामना हरतो तेव्हा तो पहिल्यांदा म्हणतो की, त्याला पुन्हा दुसरा सामना हवा आहे. कमला हॅरिस यांना आणखी एक डिबेट हवी आहे. याचा अर्थ त्यांनी आधीची डिबेट हरली आहे आणि आता त्यांना जिंकण्याची आणखी एक संधी हवी आहे. ट्रम्प म्हणाले, निवडणुकीपूर्वी मी दोन डिबेटमध्ये भाग घेतला आहे. दोन्हींतही यशस्वी झालो आहे. त्यामुळे तिसऱ्या डिबेटचे कारण नाही. कमला हॅरिस यांनी गुरुवारी आणखी एका डिबेटची मागणी केली होती. मतदारांसाठी आणखी एका डिबेटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, असे हॅरिस यांचे म्हणणे आहे.

कमला हॅरिसच्या इयरिंग्जची चर्चा

कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या डिबेटच्या वेळी घातलेल्या कानातल्यांची म्हणजेच ईयरिंग्जची जोरदार चर्चा सुरू आहे. कमला हॅरिस यांनी इयरपह्नसारखे दिसणारे इयरिंग घातले होते, त्याच्यावरून वाद सुरू झालाय. समर्थकांच्या मते या खास ब्रॅण्डच्या मोत्यांच्या इयरिंग्जची किंमत 800 ते 3000 डॉलरपर्यंत आहे.