बुद्धिबळाचा नवा राजा! डी. गुकेश बनला सर्वात तरुण World Chess Champion

हिंदुस्थानचा आघाडीचा ग्रॅण्डमास्टर दोम्माराजू गुकेशने World Chess Championship चा किताब जिंकत हिंदुस्थानच्या शिरपेचाना मानाचा तुरा रोवला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने हा बहुमान पटकावला आहे. गुकेशने अटीतटीच्या लढतीत गतविजेत्या चिनच्या डिंग लिरेनचा 14 व्या फेरीत पराभव केला.

सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेतील 11 व्या डावात गुकेशने लिरेनला मागे टाकत 6.5 गुणांची कमाई करत जेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले होते. पंरतु 12 व्या डावात लिरेनने चतुराई दाखवत बरोबरी साधली. 13 व्या डावात दोघांनीही विजयासाठी प्रयत्न केले परंतु दोघांनाही विजय मिळवता आला नाही. 13 वा डावही बरोबरीत सुटल्यामुळे अजिंक्यपद कोण पटकावणारा याचा फैसला 14 व्या डावावर येऊन ठेपला. 14 व्या डावात डी. गुकेशने कोणतीही चुक न करता बाजी मारली आणि जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले.