Kalyani nagar Accident : विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून हाळनोर याने बदलला रक्ताचा नमुना

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी विशाल अगरवाल याने डॉ. तावरे यांच्या मध्यस्थीने डॉ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच विशाल अगरवाल यांच्या सांगण्यावरूनच डॉ. हाळनोर यांनी रक्ताचे नमुने बदलल्याचे तपास अधिकाऱयांनी न्यायालयात सांगितले.

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (50) आणि आई शिवानी विशाल अगरवाल (49) यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना रविवारी सुट्टीच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

त्या रात्री मद्यधुंद होतो
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल आणि अल्पवयीन मुलाची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी आपणच ससून रुग्णालयात जाऊन रक्ताच्या नमुन्याची छेडछाड केल्याची कबुली आईने दिली होती. शनिवारी दुपारी शिवानी यांच्यासमोर अल्पवयीन मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला. अपघाताच्या रात्री मी नशेत असल्याने मला काही आठवत नाही, असे त्याने जबाबात स्पष्ट सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अपघातापूर्वीच्या रात्रीचा घटनाक्रम विचारला असता त्याने नशेत असल्याने काही आठवत नाही, अशी स्पष्ट कबुली दिली.

आणखी काही जणांचा सहभाग
रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. या फुटेजची पाहणी केली असता त्यातून महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले असून आणखी काही जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्याऐवजी शिवानी यांनी स्वतŠचे रक्त दिल्याचे तपासात उघड झाले आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल यांनी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर यांच्याशी कशाप्रकारे आर्थिक व्यवहार केला आहे?, याचा तपास करायचा आहे. त्या दोघांच्या रक्ताचा नमुना डीएनए तपासणीसाठी पाठवायचा आहे. विशाल अगरवाल याने घटकांबळे यास दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोर यांना दिले आहेत. त्या संशयित व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे. विशाल आणि शिवानी अगरवाल यांनी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरे यांच्याशी संपर्क साधला याचा शोध घ्यायचा आहे. अल्पवयीन मुलाचे पिंवा इतरांचे रक्त घेताना वापरलेली सीरिंज आणि मूळ रक्ताचा नमुना अगरवाल यांच्याकडे दिला का? याचा तपास करायचा आहे. गुह्याच्या सखोल तपासासाठी सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा असल्याने दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन काsंघे यांनी केली. आरोपींतर्फे अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी पती-पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.