रोहिणी खडसेंच्या हस्ते बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन, सुषमा अंधारेही करणार मार्गदर्शन

दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने 4, 5 व 6 ऑक्टोबर रोजी महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलतापाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

250 स्टॉल

बुलढाणा येथे आयोजित दोन दिवसीय बचतगट प्रदर्शनीत जवळपास 250 स्टॉल लावण्यात येणार आहेत. खाद्यजत्रा, हस्तकला वस्तू हस्तशिल्प, घरगुती पदार्थ व मसाले, महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू, महिलांचा स्नेहमिलन सोहळा, महिलांचा आनंदोत्सव, महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने ही बचटगट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

समाजप्रबोधनकार प्रविणजी दवंडे यांचे किर्तन ठरणार आकर्षण

बचतगट प्रदर्शनीत दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. प्रसिद्ध समाजप्रबोधनकार पवनजी दवंडे यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या वाणीतून करणार आहेत. यासोबतच इतरही कार्यक्रम यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.